Posts

Showing posts from September, 2022

ग्रामीण विकासासाठी “वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण” : संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांचा संयुक्त उपक्रम

Image
ग्रामीण विकासासाठी “वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण” : संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांचा संयुक्त उपक्रम संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी व रिलायन्स फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने "वातावरण बदलास अनुकूल समाज निर्माण करण्याच्या" उद्देशाने बिलोली, नायगाव व मुखेड तालुक्यातील सर्व गावांमधे ५ वर्ष कालावधीसाठी हा प्रकल्प राबविला जाणार असून पहिल्या वर्षी 30 गावांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहीत करणे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि बचत गट यांना उद्योग निर्मितीसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. या संदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी दि.२२ ऑगस्ट रोजी रिलायन्स फाउंडेशन चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक श्री.राम कृष्ण,, श्री नितीन शर्मा, राज्य प्रकल्प व्यवस्थापक व त्यांची नांदेड ची टीम, संस्थेचे संचालक श्री.रोहित देशमुख, वर...

शाश्वत उपजीविकेसाठी शेती व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते... प्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे

Image
शाश्वत उपजीविकेसाठी शेती व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते... प्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व परिवर्तन संस्था सोमठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्र विद्यालय,सुगाव (कॅम्प) ता.मुखेड येथे शाश्वत उपजीविकेसाठी शेती व बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते... प्रसंगी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हवामानातील बदलानुसार होणारा किड व रोगांचा प्रादुर्भाव याविषयी माहिती दिली आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना पिक फेरपालट,बीजप्रकिया, कामगंध सापळे,चिकट सापळे,वनस्पतीजन्य किटकनाशक,जैविक किटकनाशक तसेच शिफारशीतील रासायनिक किटकनाशकांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तर डॉ.संतोष चव्हाण यांनी बदलत्या हवामानात फळबाग व्यवस्थापनासह, एकात्मिक पिक पद्धतीविषयी मार्गदर्शन करताना फळबाग, भाजीपाला लागवड व फुलशेती या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रशिक्षण विभागातील प्रा.तुकाराम मंत्रे यांनी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत चालणाऱ्या विविध ...

कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म.ज्यो.फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग

Image
कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म.ज्यो.फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग ग्रामीण भागात राहणारे अनेक व्यक्ती रोगाचे निदान न होऊ शकल्याने किंवा लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जोड करू न शकल्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पुढे तो दुर्धर बनतो आणि रुग्णाचा अंत होतो. याविषयी जनजागृती व्हावी आणि गरजू व्यक्तींना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक आ.कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर यांच्या वतीने आज (दि. १७ ऑगस्ट) सगरोळी येथील माणिकप्रभू मठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सगरोळी व परिसरातील १०३ महिला, ९ बालके यासह ३२७ हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वसाधारण आजारासह कान, नाक, घसा, अस्थिरोग, कर्करोग, बालरोग आदी रुग्णांनी याचा लाभ घेतला. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वै...

एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन...

Image
एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कापूस हे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिक आहे व मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड होते. कापूस पिकातील सर्वात महत्वाची किड म्हणून गुलाबी बोंडअळी ओळखली जाते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाठ (खु.) ता. कंधार जि. नांदेड येथे "गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन" या विषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना सुरुवातीला गुलाबी बोंड अळीची ओळख व तिचा जीवनक्रम याविषयी मार्गदर्शन केले. गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी बीटी कापसासोबत नॉन बीटी कापूस लागवडीचे महत्व, गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर, प्रकाश सापळ्यांचा वापर, मित्रकिटकांचे संगोपन आणि त्यांचा वापर, शिफारशीतील किटकनाशकांचा वापर ईत्यादीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसण केले. प्रशिक्षणासाठी ४४ पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते. #cotton #integrated #pest #management #pinkbollworm #...

धान्यातील कीड नियंत्रण..

Image
धान्यातील कीड नियंत्रण.. धान्यातील कीड नियंत्रण ही एक महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. वातावरण बदलले आणि धान्यातील ओलावा वाढला की कीड सुरू होते अणि अश्या कीड लागलेल्या धान्याची साफ सफाई करणे महिलांसाठी किचकट काम होते. त्यासोबतच धान्याचे देखील नुकसान होतें. हे नुकसान टाळण्यासाठी अणि कीड नियंत्रणाच्या उद्देशाने बरबडा ता. नायगाव येथे पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया विकसीत कीड नियंत्रक बॅग ज्याला ग्रेन प्रो बॅग असे म्हणतात आणि तामिळनाडू कृषी विद्यापीठ विकसीत कीड पकडण्याचे सापळे ज्याला इंसेक्ट प्रोब ट्रॅप म्हणतात या दोन्हींचे प्रात्यक्षिक संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत महिलांना देण्यात आले. #grain #insects #trapped #grain_pro_bag #household #pestcontrol #insect_trap #PCI #TNAU #agri #धान्यातील #कीड #नियंत्रण #शेतकरी_brand #शेतकरी_महिला #grain_losses